ख्रिस्ती समाजाकडे पैसा नाही किंवा ख्रिस्ती लेखकांकडे प्रतिभा नाही, असे नाही. मग ही दुरावस्था का?
आपले प्रश्न आपणच सोडवू शकतो याची जाणीव असणे गरजेचे आहे. त्यासाठी खंबीर राजकीय नेतृत्वाची गरज आहे. निरनिराळ्या राजकीय पक्षात ख्रिस्ती नेते कार्यरत आहेत, परंतु पक्षश्रेष्ठींसमोर ते नांग्या टाकतात. परिणामी ख्रिस्ती समाज विकासापासून कोसभर दूरदूरच राहिला आहे. समाजातून नेतृत्व उभे राहत असेल किंवा घडत असेल तर त्यामागे आम्ही एक दिलाने उभे राहिले पाहिजे. त्यातूनच सामाजिक विकास साधला जाईल.......